लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Pune ACB) इतिहासात सर्वात मोठ्या ५०० कोटी रुपयांच्या अपसंपदा बाळगल्याबाबतच्या खटल्याचा सर्वात जलद व सर्वोत्कृष्ट तपास केल्याबद्दल पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे (Police Inspector PI Girish Sonawane) यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (सुवर्ण) जाहीर झाले आहे.
पुणे : PI Girish Sonawane | लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Pune ACB) इतिहासात सर्वात मोठ्या ५०० कोटी रुपयांच्या अपसंपदा बाळगल्याबाबतच्या खटल्याचा सर्वात जलद व सर्वोत्कृष्ट तपास केल्याबद्दल पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे (Police Inspector PI Girish Sonawane) यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (सुवर्ण) जाहीर झाले आहे.
गृहमंत्रालयाकडून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकासाठी एनआयए, सीबीआय आणि राज्य शासनाचे पोलीस यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट तपास मागविले जातात. त्यात महाराष्ट्रासाठी ११ पुरस्कार असतात. त्यात गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी केलेला हा तपास सर्वोत्कृष्ठ ठरला आहे.
नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) याच्या मालमत्तेचा तपास हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासतील सर्वात मोठा अपसंपदा खटला ठरला. या खटल्यात ८ महिन्यात पहिले दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी दाखल केले होते. १०० हून अधिक साक्षीदारांचे जाब जबाब घेण्यात आले होते. तब्बल ४० हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरु आहे. हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) याची उत्पन्नापेक्षा ११६२ टक्के अधिक मालमत्ता आढळली आहे. त्याच्या २० बेनामी मालमत्ता सुरुवातीला उघड झाल्या असून त्यात नंतर अधिक भर पडली होती. हनुमंत नाझीरकर (Hanumant Nazirkar) याच्या ३८ बेनामी कंपन्या आणि त्यात गुंतविलेला पैसा याचा अतिशय गुंतागुंतीचा हा तपास होता.
या पुरस्काराबद्दल बोलताना पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी सांगितले की, केंद्रीय पातळीवरील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यात गुंणवत्तेनुसार माझा पहिला क्रमांक आहे. आपल्या कामाची अगदी केंद्रीय पातळीवरुन दखल घेतल्याचा खूप आनंद आहे. अशा पुरस्कारामुळे अधिक जिद्दीने आणि कठोर मेहनत घेऊन काम करण्याची प्रेरणा मिळते, असे पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे Police Inspector Girish Sonawane यांनी पुणे शहर पोलीस दलात २०१२ ते २०१९ या काळात फरासखाना पोलीस ठाणे, सिंहगड रोड पोलीस ठाणे, गुन्हे शाखा येथे काम पाहिले आहे. त्यानंतर २०१९ ते २०२३ दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागात ते कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. त्यापैकी एक हा हनुमंत नाझीरकरच्या बेहिशोबी मालमत्तेचा होता. सध्या ते राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत.