अकोला दि.20 ऑगस्ट 2022 – राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या, तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याच्या कार्यक्रमातील सुनावणीच्या टप्प्यापासून प्रभागाच्या सीमा निश्चित करण्यासाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता.

त्यानुसार प्रभाग रचना कार्यक्रमानुसार अंतिम प्रभाग रचनेला संबधित ठिकाणच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध देण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं./ जि.प./ पं.स. निवडणुक विभाग संजय खडसे यांनी कळविले आहे.