ग्राहक संरक्षण परिषदेने मांडलेल्या समस्या तात्काळ सोडविण्यास प्राधान्य – जिल्हाधिकारी

सातारा दि. 19 ऑगस्ट 2022 : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्राहकांच्या मांडलेल्या सर्व समस्या व प्रश्न सोडविण्यास संबंधित विभाग व जिल्हा प्रशासन प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

ग्राहक संरक्षण परिषदेने मांडलेल्या समस्या तात्काळ सोडविण्यास प्राधान्य – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री. जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत टोल नाका संबंधित प्रश्न, शहरातील रस्त्यांवरील कचरा, पार्कींग सुविधा, सार्वजनिक वाहतूक रिक्षा मिटरचे दर निश्चित करणे, सेतू कार्यालयांमध्ये दाखल्यांसंदर्भात आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे फलक लावणे, विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देणे, शहरात विविध ठिकाणी सिग्नल लावणे, खुली असणारे गटारे बंदीस्त करणे, शाळा व महाविद्यालयाच्या ठिकाणी गर्दी असल्याने त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार करणे या विषयांबाबत बैठकीत मुद्दे उपस्थित करण्यात आले.

राष्ट्रध्वज संकलन उपक्रम – ग्राहक संरक्षण परिषदेतर्फे शहरात राष्ट्रध्वज संकलन उपक्रम राबविण्यात येत आहे. परिषदेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, यापुढे वापरात नसलेले व खराब झालेले राष्ट्रध्वज नागरिकांनी कोठेही सार्वजनिक ठिकाणी न टाकता जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रेणुका पेट्रोल पंप येथे जमा करावेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment