ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूकः उमेदवारांच्या जाती पडताळणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अकोला दि.22(आजचा साक्षीदार) – जिल्ह्यातील ग्रामपंचायती च्या सार्वत्रिक निवडणूकासाठी संगणकप्रणालीव्दारे आरक्षीत जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारून जात वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था संबंधित तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूकः उमेदवारांच्या जाती पडताळणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीव्दारे राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत.

या ग्रामपंचायतीच्या आरक्षीत जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर/ दाखल करणे सोईचे व्हावे या करीता तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतच्या आरक्षीत जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज नामनिर्देशन भरण्याच्या दिलेल्या मुदतीपर्यंत अखेरच्या दिवसापर्यंत स्विकारून प्राप्‍त झालेल्या अर्जावर तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी सही शिक्क्यानिशी प्रमाणित करून लगेच जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करावे,असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूमीकीरता आरक्षीत जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारून जात वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment