0 0
Read Time:3 Minute, 51 Second

चाहत्यांना सांगेन ठोक दो साले को… अमिताभ बच्चन (बिग बी)

अमिताभ बच्चन हे ११ जुलै २०२० पासून नानावटी इस्पितळात करोनावर उपचार घेत आहेत त्यांच्यावर आणि अभिषेक बच्चन वर सुद्धा उपचार सुरू आहेत. सोमवारी त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांना इस्पितळातून घरी सोडण्यात आले. अमिताभ बच्चन (बिग बी) यांनी याबाबत सोशल मीडियावर स्वतः याबद्दल माहिती दिली. सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या या दोघी या आजारातून सुखरूप बाहेर पडल्याच्या आनंदात बिग बी स्वतःचे आनंदाश्रू रोखू शकले नाहीत. याचा उल्लेख त्यांनी आपल्या वैयक्तिक ब्लॉगमध्ये केला आहे. 

Amitabh Bachchan (Big B) Responds To Trollers Telling Him To “Die Of COVID” With A Threat…

यासोबतच त्यांनी अशा एका ट्रॉलर च्या ट्रोलला उत्तर दिलं ज्याने त्यांच्या मरण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमिताभ बच्चन (बिग बी) म्हणाले, तुला माहीत नाहीये तुझे वडील कोण आहेत… तसेच ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला उत्तर देताना त्यांनी लिहिले आहे की, ‘आशा व्यक्त करतो की तू या करोना आजाराने मरशील..’ बेनावी मेसेज लिहिणाऱ्या माणसा तू तुझ्या वडिलांचं नावही लिहिलं नाहीस. कारण तुला कदाचित आपल्या वडिलांचं नावच माहीत नसेल. एक तर मी मरेन किंवा वाचेन फक्त या दोन गोष्टी होऊ शकतात .. जर मी मेलो तर सेलिब्रिटी बद्दल असं लिहिल्यानंतर तू आधीच स्वतःचं नाव खराब करून घेतलंस आहे त्यामुळे दुसऱ्या कोणाबद्दल तू असं आता काही लिहू शकत नाहीस.. तुझ्यावर तर फार दया येते. तुझी ही कमेन्ट माझ्या फक्त एवढ्यासाठी लक्षात आली कारण तू अमिताभ बच्चन यांच्या बद्दल वाईट लिहले आहेस.. जो जास्त काळ राहणार नाहीये.. 
अमिताभ बच्चन (बिग बी) यांनी पुढे लिहिले की, ‘देवाच्या कृपेने जर मी या आजरातून यातून मुक्त झालो तर फक्त माझ्याकडूनच नाही तर माझ्या ९० लाखांहून जास्त चाहत्यांकडून त्याला अनेक खडे बोल ऐकून घ्यावे लागणार आहेत.’ एवढंच नाही तर अमिताभ बच्चन (बिग बी) यांनी कठोर शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, ‘मी अजून त्यांना असं काही करायला सांगितलं नाहीये पण जर मी यामधून वाचलो .. आणि मी आत्ताच सांगतो की माझ्या चाहत्यांच्या मनात मनात राग आहे.. ते तुला शोधण्यासाठी सर्व जग पार करतील.. पश्चिम दिशेपासून पासून पूर्वेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणेकडे सगळीकडे, सर्व दिशांनी तुझा शोध घेतील. आणि मी त्यांना शेवटी सांगेन.. ‘ठोक दो साले को”

चाहत्यांना सांगेन ठोक दो साले को… अमिताभ बच्चन (बिग बी)

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *