जगातील सर्वात मोठे कार्गो विमान (Cargo Plane) कोरोना मदतीचे सामान घेऊन भारताकडे रवाना…

कोरोना व्हायरस  (Corona virus Heulp) विरूद्धच्या लढ्यात भारताला मदत करण्यासाठी जगातील सर्वात मोठे कार्गो विमान(World’s Largest Cargo Plane from England) मदत सामग्रीसह नवी दिल्लीकडे रवाना झाले आहे. विमानात 18-टन ऑक्सिजन जनरेटर आणि एक हजार व्हेंटिलेटर आहेत. ब्रिटिश सरकारने(UK Government) याबद्दल माहिती दिली. तसेच संकटांच्या या वेळेत आम्ही भारताच्या सोबत असून शक्य तितकी मदत पुरविली जाईल असेही ते म्हणाले. शुक्रवारी या विमानाने उत्तर आयर्लंडहून भारतासाठी उड्डाण केले.

कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारताला सर्वतोपरी मदत पुरविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कोरोनाच्या भारतातील बिघडत्या परिस्थितीमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. अमेरिका, ब्रिटनसह सर्व देश या साथीच्या लढाईत भारताला मदत करीत असल्याचे ब्रिटनने म्हटले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment