जनावरांमधील रोगनियंत्रणासाठी ग्रामस्तरावर कार्यकारी समित्या  जनावरांमध्ये थायलेरियासिस व लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे  पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनावरांवर औषधोपचार

वर्धा दि. 03 : जिल्हयात काही भागात जनावरांमध्ये थायलेरियासिस व लेप्टोस्पायरोसिस या रोगाची लक्षणे आढळून आली आहे. यामुळे काही ठिकाणी काही प्रमाणात जनावरे मृत्युमुखी देखील पडली आहे. या दोनही रोगाबाबत गावक-यांमध्ये जनजागृती करण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी गावस्तरावर कार्यकारी समित्या देखील स्थापन करण्यात आल्या आहे.

जनावरांमधील रोगनियंत्रणासाठी ग्रामस्तरावर कार्यकारी समित्या
 जनावरांमध्ये थायलेरियासिस व लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे
 पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनावरांवर औषधोपचार

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहे. थायलेरियासिस या रोगाची लक्षणे 105 डिग्री सेंटीग्रेट किंवा त्यापेक्षा जास्त ताप येणे, धाप लागणे, चारापाणी कमी होणे, स्थुलता आणि अशक्तपणा येणे, नाक व तोंडातून पाणी गळणे, लसिकाग्रंथीचे आकारमान वाढणे, रक्तक्षय होणे आणि श्लेषमय त्वचा फिकट गुलाबी रंगाची होणे, काविळ होणे, लघवी गडद पिवळ्या रंगाची होणे ही लक्षणे आहे.

लेप्टोस्पायरोसिस या रोगाची लक्षणे थायलेरियासिस प्रमाणेच असून त्याशिवाय दुधाचा रंग लालसर किंवा गुलाबी होणे, गर्भपात होणे ही लक्षणे आहे. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोचीड निर्मुलन, गोमाशा निर्मुलन यासह गोठा व जनावरे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. पशुपालकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासोबतच हा रोग गावातील जनावरांमध्ये पसरु नये यासाठी गावस्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यात सरपंच समितीचे अध्यक्ष तर ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक हे सदस्य सचिव असतील तर उपसरपंच व किमान तीन व्यक्ती सदस्य असतील. याशिवाय संबंधित गावाचे वैद्यकीय अधिकारी/आरोग्य सहाय्यक, पशुधन विकास अधिकारी/ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी/पशुधन पर्यंवेक्षक यांचा समावेश असेल.

ही समिती पशुसंवर्धन विभागाचा सल्ला व मार्गदर्शना नुसार जनावरांमधील रोग प्रादुर्भाव नियंत्रण ठेवण्यासाठी पशुपालकाचे प्रबोधन करतील. लक्षणे आढळल्यास तातडीने जनावरांवर औषधोपचार करतील. जनावरांमधील रोग लक्षणाचा दैनंदिन अहवाल पशुसंवर्धन विभागास सादर केल्या जातील.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment