जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृतीजलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

शिर्डी, दि.१४ मे २०२३ (आजचा साक्षीदार) – जलयुक्त शिवार योजना २.० योजनेत राहाता तालुक्यातील २१ गावाची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये ८ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून तालुका प्रशासन शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची गावांमध्ये जनजागृती करत आहे.

कृषी विभागाची विविध कामे, शेततळे, गॅबियन बंधारे, ड्रीप स्प्रिन्क्लर सिंचन, खोलीकरण करणे, पाणीसाठा वाढविणे, पाझर तलावातील गाळ काढणे, नवीन सिमेंटचे बांध बांधणे, जून्या नाल्यांचे पुनरूज्जीवन करून त्यांना उर्जित आवस्था प्राप्त करून देणे या कामांची या शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली.

राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व ‍जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शिवार फेऱ्या काढण्यात आल्या. पाथरे बु., तिसगाव, लोणी बु, रांजणगाव खु, सावळीविहीर बु हनुमंतगाव, लोहगाव, हसनापूर, सावळीविहीर खु, ममदापूर, भगवतीपूर, दुर्गापूर, नांदुर्खी खु, नांदुर्खी बु , साकुरी ,दाढ बु, रांजणखोल, नांदूर बु , अस्तगाव, डोऱ्हाळे व शिंगवे या गावांची जलयुक्त शिवार योजना २.० साठी निवड करण्यात आली आहे.

शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रतिभा खेमनर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब शिंदे, पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता देविदास धापटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, जलसंधारण अधिकारी, ग्रामसेवक, वनरक्षक यांच्या समन्वयातून सर्व गावात नियोजनबद्धरित्या शिवार फेऱ्या पार पडल्या. ह्या शिवार फेरीत गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जलसंधारणासह विविध कामे सुचविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *