जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार

आजचा साक्षीदार दि. 29 जानेवारी 2025: राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय मतदारदिनी म्हणजेच 25 जानेवारीरोजी  पुणे येथील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

06 – अकोला लोकसभा मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार काम पाहिले. त्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केला होता.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार

त्याबद्दल अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी अनिता भालेराव आदींनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिका-यांचे अभिनंदन केले.

‘निवडणुकीच्या काळात सर्व अधिकारी- कर्मचा-यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन निवडणुकीची प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडली. सर्वांच्या योगदानामुळे जिल्ह्याला पुरस्कार प्राप्त झाला’, असे सांगून जिल्हाधिका-यांनी सर्व सहका-यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment