जालना, दि. 18 ऑगस्ट 2022:- देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आभिवादन केले.तसेच सद्भावना दिनाची उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, तहसीलदार संतोष गोरड,तहसीलदार प्रशांत पडघन,संजय चंदन,याया पठाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.