जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन….
वर्धा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने कार्यालयाच्या सभागृहात दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, सुधीर गवळी, मिलींद जुनगाडे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर प्रदर्शन तीन दिवस सुरु राहणार असून सर्व वाचकांसाठी खुले आहे.
या प्रदर्शनात राज्यातील नामवंत प्रकाशकांसह वृत्तपत्राचे दिवाळी अंक ठेवण्यात आले असून प्रदर्शंन संपल्यानंतर ग्रंथालयाच्या वाचकांना उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री सोनोने यांनी केले आहे.