Shrirampur 24Tass : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाच्या वतीने आदिवासी तरूणांना आदिवासी दिनानिमित्त बॅटरीवरील रिक्षांचे वितरण आ. डाॅ.सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शांताबाई खैरे, पंचायत समिती सदस्या स्वाती मोरे, आदिवासी सेवक बाबा खरात, नामदेव पारधी, ज्ञानेश्वर राक्षे, सर्व जनसेवक व आदि उपस्थित होते.