माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या "स्पार्क" कार्यक्रमाची सुरुवात
0 0
Read Time:4 Minute, 14 Second

जिल्हा पुरस्कार-2023 चा लाभ घेण्यासाठी
पात्रता असणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

रायगड,दि.18 : सुक्ष्म व लघु उद्योजकांनी सुयोग्य तंत्रज्ञानाची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकाची निकोप वाढ व्हावी, यासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांना प्रेरित करण्याच्या उददेशाने जिल्हा पुरस्कार योजना राज्य शासनाने 1985 पासून कार्यान्वित केली असून जिल्ह्यातील पात्रता असणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी केले आहे.

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई
जिल्हा पुरस्कार-2023 चा लाभ घेण्यासाठी
पात्रता असणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

या योजनेंतर्गत मोठ्या संख्येने उद्योजकांचे अर्ज प्राप्त होण्यासाठी या योजनेबाबत प्रसिध्दी देण्यात येते. या व्यतिरिक्त जिल्हयातील सर्व औद्योगिक संघटनांना त्यांच्या सदस्य उद्योजकांनी अधिकाधिक संख्येने अर्ज करावे यासाठी आवाहन केले जाते. शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन विजेत्या उद्योजकांची/ घटकांची निवड केली जाते. निवड करण्यात आलेल्य उद्योजकांना प्रथम पारितोषिक रु. 15 हजार, सन्मान चिन्ह तसेच व्दितीय पारितोषिक रु. 10 हजार सन्मान चिन्ह देण्यात येते.

आधिकाधिक सूक्ष्म व लघु उद्योजकांनी त्यांच्या तंत्रज्ञान, कार्यपध्दती, व्यवस्थापन कौशल्य, उत्पादकता आणि उत्पादनातील नाविन्य, संशोधन व विकास इत्यादीबाबत सुधारणा करावी यासाठी उद्योजकांना प्रेरित करण्याच्या हेतुने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन विजेत्यांचा सत्कार करणे ही या योजनेमागील भूमिका आहे.

जिल्हा पुरस्कार योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पात्रता :- ज्या घटकांनी यापूर्वी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत असे घटक या पुरस्कारास पात्र होणार नाहीत. उद्योग संचालनालयाकडे कमीत कमी मागील 3 वर्षाच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या सूक्ष्म व लघु उद्योग नोंदणी म्हणून नोंदणीकृत झाले असले पाहिजे. मागील 2 वर्षात सलग उत्पादन करत असणारे घटक पात्र ठरतील. अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

पात्रता असणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजारासमोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, जिल्हा रायगड, ईमेल आयडी didicraigad@gmail.com व्यवस्थापक एस.एस. बिराजदार यांच्याशी (संपर्क क्रमांक 848581 0656) प्रत्यक्ष संपर्क साधावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *