जिल्हा सामान्य रुग्णालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न…

वाशिम, दि. 01: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त वतीने ३० ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे आणि जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. खराडे यांची उपस्थिती होती.

जिल्हा सामान्य रुग्णालयात कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न…

श्री. टेकवाणी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित महिलांना केले. महिलांना कधीही मोफत विधी सेवेची आवश्यकता असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम येथे संपर्क साधावा असे सांगितले.

डॉ. काळबांडे यांनी महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली. नायब तहसिलदार श्री. देवळे यांनी महिलांसंबंधीत असलेल्या राज्य सरकारच्या योजनेबद्दल माहीती दिली. उपशिक्षणाधिकारी श्री. डाबेराव यांनी महिलांचे शिक्षणविषयक अधिकार व त्यांच्या पाल्यांसाठी शाळेमध्ये प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक स्वाती इथापे यांनी महिलांवर अत्याचार किंवा जबरदस्ती होत असेल व कोणताही अन्याय होत असल्यास त्याबाबत निर्भिड होऊन संबंधीतांकडे तक्रार करावी असे आवाहन केले. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांचे प्रतिनीधी जीनसाजी चौधरी यांनी महिला व बालकासंबंधी असणाऱ्या सरकारी योजनांची माहीती दिली.

कार्यक्रमाचे संचालन शांताराम गायकवाड यांनी केले. आभार गोपाल चोपडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, समाजसेवी संस्थांचे कर्मचारी आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment