जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

जालना, दि. 30 ((आजचा साक्षीदार)) :- लक्ष्मणराव इनामदार नॅश्नल अकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र व सहकार मंत्रालय आणि शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील जे.ई.एस. महाविद्यालयात दि.29 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेस मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, उपप्राचार्य डॉ.महाविर सदावर्ते, डॉ.फाळके, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त रश्मी नाईक, उपसंचालक अक्रिष्टा रितु, प्रतिक दंडीमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न
जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेत गुणवत्तापूर्ण बीज निर्मिती, बीज संकलन, मच्छीचे कोल्डस्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजर पेठेतील उपलब्धता, राष्ट्रीय स हकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी विविध मच्छीमार संस्थेच्या मच्छीमार प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment