जिल्ह्यात दि. 15 जानेवारी रोजी पीएम जनमन कार्यक्रमाचे आयोजन
रायगड दि.15 :- देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी मा.प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान या योजनेचे दि.15 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यान्वय करण्यात आले आहे. या योजनेच्या अनुषंगाने मा.पंतप्रधान महोदय दि.15 जानेवारी 2024 रोजी देशभरातील 200 जिल्ह्यातील आदिम जमातीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
त्यानुसार रायगड जिल्ह्यात सोमवार, दि. 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.30 वा. भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, घरत क्लासेस शेजारी, श्रीबाग-अलिबाग येथे पीएम जनमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची, माहिती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्रीमती शशिकला अहिरराव यांनी दिली आहे.