ठाकरे सरकारने राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मिय प्रार्थनास्थळे खुली करण्याची घोषणा
महाराष्ट्र राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर ठाकरे सरकारने राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मिय प्रार्थनास्थळे खुली करण्याची घोषणा केली. त्यानुसार, येत्या 7 ऑक्टोबरपासून मंदिराचे दार उघडले जाणार आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे बंदच आहेत. आता त्यांची कुलूपे उघडल्यावर भक्तांची एकच गर्दी होण्याची शक्यता आहेत; पण कोविडचे संकट टळलेले नाही. त्यामुळे कोरोना नियम पाळूनच भाविकांनी दर्शन घ्यावे लागणार आहे.