डिजिटल सातबारा पाठोपाठ आता गाव “नमुना 8-अ” चा उताराही ऑनलाइन मिळणार
Download Digital 7/12 Maharashtra & Namuna 8A : डिजिटल सातबारा पाठोपाठ आता जमिनीचा खाते उतारा म्हणजेच गाव “नमुना 8-अ” चा उताराही ऑनलाइन मिळणार आहे. या ‘डिजिटल 8 अ’सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
Download Digital 7/12 Maharashtra & Namuna 8A :नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत त्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘ई फेरफार कार्यक्रम च्या अंतर्गत डिजिटल स्काक्षरीत “आठ अ खाते उतारा” उपलब्ध होणार आहे. “आठ अ खाते उतारा” कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंका जमीन खरेदी-किक्रीसाठी सातबारा सोबत देखील आवश्यक असतो. त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठय़ांच्या डिजिटल सहीने उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
महाराष्ट्रात साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी घेतला डिजिटल सात बारा… Digital 7/12 Maharashtra
Download Digital 7/12 Maharashtra & Namuna 8A : आजपर्यंत महाराष्ट्र राज्यात साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी ‘डिजिटल 7/12‘ घेतला आह़े त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल 8 अ’ला सुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे असे महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले तसेच महसूल प्रशासन लोकाभिमुख व अधिक गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे आव्हाहन महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.
येथे डाउनलोड करा तुमचा “डिजिटल सातबारा” व गाव “नमुना 8-अ”