हिंगोली, दि. 15 ऑगस्ट 2022 : डी.एल.एड. प्रथम वर्ष सन 2022-23 मधील शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीद्वारे ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज सादर करण्यासाठी 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट, 2022 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने ऑनलाईन प्रवेश देण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.