जालना, दि. 01 – जालना शहरात तसेचजिल्हयात मागील काही दिवसात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठुनमोठया प्रमाणात डास व डास-अळीची संख्या वाढलेली निदर्शनास येत आहेत. या डासांमुळे मोठया प्रमाणात डेंग्यू/ मलेरिया सदृष्य रुग्णांची संख्यामोठया प्रमाणात वाढत आहे. अशा रुग्णांमध्ये सर्दी, ताप वारंवार खोकला अंगावर पुरळ,उलटया, मळमळ अशी लक्षणे आढळतात. तसेच रक्तातील प्लेटलेट कमी होऊन अशक्तपणा जाणवतोआरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन डेंग्यु /मलेरिया आजार होऊ नये म्हणून सर्वतोपरीप्रयत्नशील आहेत. हे आजार होऊ नयेत म्हणूननागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. एडीस एजिप्ती डासामुळे डेंग्यु आजार पसरत असुन या डासाची उत्पतीसाचलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्याच्या गृहभेटी मध्ये प्रत्येक गावात व शहरात घरोघरी भेटी देऊन किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक घरातील पाणी साठे तपासणी करुन साठयात डेंग्यु आळया (लारवा) आढळुन आल्यासअशी भांडी रिकामी करावी लागतात , रिकामी होऊ न शकणाऱ्या पाणी साठयात डासअळी नाशकटेमीफॉसचे द्रावण आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत पाणीसाठयात टाकण्यात येत आहे.

सर्व जनतेने डासापासून स्वत.चे संरक्षण करण्यासाठी डासनाशकमच्छरदाणी , डास नाशक अगरबत्ती मॉस्कीटो कॉइल मॉसकिटो रॅकेट , अंगावर लावायाचे मॉस्कीटो क्रीमचा वापर करावा तसेच घरातील पाणी साठेवेळोवेळी स्वच्छ करावेत, कुलरमधील पाणी, फुलदाण्या व कुंडयामधील पाणी नियमीतपणेबदलावे, किमान आठ दिवसातून एक दिवस पाणीसाठयाचा कोरडा दिवस पाळावा. घराजवळ साचलेलेपाणी वाहते करावे. घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील कुण्या व्यक्तीस तापसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी. तसेच डासअळी भक्षक गपीमासे साचलेल्या पाण्यात सोडण्यात यावीत. गप्पी मासे जवळच्या आरोग्य केंद्रातुन घेऊन मोठया पाणीसाठयात तसेच डबक्यात सोडण्यात यावेत. नागरीकांनीखबरदारी म्हणून डास उत्पती स्थाने नष्ट करावीत , डासापासुन स्व:ताचे संरक्षण करावे,घर व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगांवकरयांनी केले आहे.







