डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या 17 कोटी 29 लाखांच्या कामांना मंजूरी - श्री. शंभूराज देसाईडोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या 17 कोटी 29 लाखांच्या कामांना मंजूरी - श्री. शंभूराज देसाई

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या 17 कोटी 29 लाखांच्या कामांना मंजूरी – श्री. शंभूराज देसाई

सातारा दि. १४ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 17 कोटी 29 लाख रुपये निधी खर्चाच्या कामांना मंजूरी देण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली.

https://sakshidar.co.in/category/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

या बैठकीस आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, महेश शिंदे, मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कायर्कारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी तसेच सर्व सदस्यांना समन्यायी पध्दतीने निधी वाटपाचे सुत्र यावेळी ठरविण्यात आले. तसेच सर्व सदस्यांनी कामांची यादी दिली असून त्यानुसार लवकरात लवकर कामे सुरु करावी व शंभर टक्के निधी खर्च होईल याकडे यंत्रणांनी लक्ष द्यावे अशा सुचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *