0 0
Read Time:11 Minute, 21 Second

स्पर्धा परीक्षा  – एक करियर ::  तयारी स्पर्धा परीक्षांची

सध्या मराठी पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना (Preparation of Competitive Exam in Marathi) प्राधान्य देण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्पर्धा परीक्षांकडे वळण्यामागे केवळ सामाजिक प्रतिष्ठा, सरकारी बंगला,शासकीय नोकरी,लाल दिव्याची गाडी, मान सन्मान यांचेच नुसते आकर्षण असून चालणार नाही तर नेमके काय साध्य करायचे आहे याविषयी स्पष्टता असणे फार आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध सेवांसाठी खालील यादीतील परीक्षा घेतल्या जातात.या सर्वच परीक्षा ‘एमपीएससीची परीक्षा’ (MPSC EXAM) याच नावाने ओळखल्या जातात.

  • राज्य सेवा परीक्षा (State Services Examination)
  • महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agricultural Services Examination)
  • महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Examination)
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-A Examination)
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-B Examination)
  • सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (Assistant Motor Vehicle Inspector Examination)
  • दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा. Civil Judge (Jr. Div.) Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam
  • पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (Police Sub Inspector Examination)
  • विक्रीकर निरीक्षक परीक्षा (Sales Tax Inspector Competitive Examintion)
  • लिपिक-टंकलेखक परीक्षा (Clerk typist Examination)
  • कर सहायक गट-क परीक्षा (Tax Assistant Examination)
  • सहायक परीक्षा  (Assistant Examination)
  • सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब (Assistant Engineer (Electrical) Grade-2, Maha. Electrical Eng. Services, B)

सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi),  चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) आणि स्पर्धा परीक्षा (Competitive Exam in Marathi) याबाबत थोडेसे ….

सर्व  स्पर्धा परीक्षांचे (Preparation of Competitive Exam in Marathi) प्रश्नांची पद्धत, स्वरूप, दृष्टिकोन बदलला आहे. पीएसआय/ एसटीआयसारख्या परीक्षांसाठी सुद्धा यूपीएससी पॅटर्न चा अवलंब केला जात आहे. एकूणच स्पर्धा वाढली आहे आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा कस चांगलाच लागत आहे, हे मागील तीन – चार  वर्षांतील एमपीएससीच्या विविध परीक्षांचे कटऑफ आणि निकालावरून आपण पहिलेच आहे.

स्पर्धा परीक्षात (Preparation of Competitive Exam in Marathi) झालेले व भविष्यात होत राहणारे बदल, बदलते प्राधान्यक्रम यांच्याशी जुळते घेण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन उमेदवारांनी अंगीकारणे आवश्यक आहे. त्यामुळेच स्पर्धेत टिकणे शक्य होईल. म्हणूनच ध्येय यूपीएससी असेल किंवा एमपीएससी किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षा सर्व परीक्षांची माहिती घेऊन अभ्यासाची योजना आखायला हवी असे आम्हास वाटते.

सामान्य ज्ञान जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) आणि चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) हा घटक स्पर्धा परीक्षा (Competitive Exam in Marathi) दृष्टीने  अतिशय महत्वाचा घटक आहे, दिवसेंदिवस विविध माध्यमांच्या माध्यमातून यावर खूप भर दिला जात आहे व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या https://sakshidar.co.in या वेब साईट च्या  माध्यमातून आमच्या https://sakshidar.co.in ह्या वेब साईट वर जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी वर आधारित सर्व प्रश्नसंच  दैनिक स्वरूपात  उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) दिन विशेष 

खाली दिलेले सामान्य ज्ञानजनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) आणि चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) वरील दिनविशेष हे आपणास महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या विविध विभागातील भरतीसाठी तसेच मुख्य करून एमपीएससी भरती  (MPSC Bharti), युपीएससी भरती (UPSC Recrutitment), रेल्वे भरती  (Railway Recruitment), एलआयसी भरती  (LIC – AAO Recrutitment), बँकिंग भरती  ( Banking Recruitment), स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती (SSC Recrutitment) पोस्ट ऑफिस भरती  (Post office Recruitment), संरक्षण दल भरती (Indian Army Recruitment) व इतर स्पर्धा परीक्षा भरतीसाठी नक्की उपयोगी ठरतील अशी आम्हास आशा आहे. 

Best of Luck!

♻️ महत्वाचे दिन ♻️

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस

०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)

०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन

१० जानेवारी == जागतिक हास्य दिन

१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन

२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन

२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन

३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन

————————————————————

१४ फेब्रुवारी == टायगर डे

१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन

२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन

२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन

२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन

————————————————————

०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन

०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन

१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन

१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन

२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन

२२ मार्च == जागतिक जल दिन

२३ मार्च == जागतिक हवामान दिन

————————————————————

०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन

०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन

१० एप्रिल == जलसंधारण दिन

११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन

14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 

२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन

२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन

————————————————————

०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

०३ मे == जागतिक उर्जा दिन

०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन

११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

१३ मे == राष्ट्रीय एकता दिन

१५ मे == जागतिक कुटुंब दिवस

१७ मे == जागतिक संचार दिवस

२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन

२४ मे == राष्ट्रकुल दिन

३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन

————————————————————

०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन

०५ जून == जागतिक पर्यावरण दिन

१० जून == जागतिक नेत्रदान दिन

१४ जून == जागतिक रक्तदान दिन

१५ जून == जागतिक विकलांग दिन

२१ जून == जागतिक योग दिन

२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन

२७ जून == जागतिक मधुमेह दिन

२९ जून == जागतिक सांखिकी दिन

———————————————

०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन

११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन

२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन

२६ जुलै == कारगिल विजय दिन

२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन

————————————

०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन

०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन

१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन

२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन

२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन

——————————

०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन

०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन

११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन

१४ सप्टेंबर == हिंदी दिन

१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस

१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन

२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन

—————————— 

०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती

०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन

०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन

०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन

१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन

१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन

२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन

३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन

३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस

—————————

०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन

०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन

१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन

१४ नोव्हेंबर == बालदिन

१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन

२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन

——————————

०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन

०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन

०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन

०४ डिसेंबर == नॊदल दिन

06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन 

०७ डिसेंबर == ध्वज दिन

०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन

१० डिसेंबर == मानवी हक्क दिन

२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन

२३ डिसेंबर == किसान दिन

२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

————————————————————

आपल्याला माहिती असणारे दिनविशेष कंमेंट बॉक्स मध्ये द्यावी. 




Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *