जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृतीजलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

तालुकास्‍तरीय शासकीय विभागांनी शासकीय योजनांचा व्‍यापक स्‍वरुपात प्रचार-प्रसार करावा – उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील | “जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्‍यांच्‍या विकासाची”

नगर दि. 9 मे 2023 : सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी योजनांचा प्रचार-प्रसार व्‍यापक स्‍वरुपात झाला पाहिजे. समाजातील तळागाळातील गरजु गरीब लोकांना योजनांचा लाभ मुदतीत मिळावा यासाठी तालुकास्‍तरीय सर्व विभागांनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. असे मत अहमदनगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्‍यक्‍त केले. “जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्‍यांच्‍या विकासाची” याबाबत उपविभागीय कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजीत तालुकास्‍तरीय आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

जिल्‍ह्यात 15 एप्रिल ते 15 जुन 2023 या कालावधीत सदर “जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्‍यांच्‍या विकासाची” अभियान राबविण्‍यात येणार असून “जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्‍यांच्‍या विकासाची” अभियान यशस्‍वी होण्‍याच्‍या दृष्‍टीने तालुक्‍यातील शासकीय विभागांनी आपल्‍या विभागाशी संबंधित शासकीय योजना तालुक्‍यातील जास्‍तीत-जास्‍त लाभार्थ्‍यांपर्यंत कशा पोहोचतील याचे नियोजन करुन या योजनेचा लाभ लाभार्थ्‍यांना करुन द्यावा. तसेच आपल्‍या कार्यालयात आलेल्‍या लाभार्थ्‍याला कुठलीही अडचण होणार नाही यासाठी कार्यालयात एका कर्मचा-याची अभियान कालावधीत नियुक्‍ती करावी, असे त्‍यांनी सांगितले.

या बैठकीत आरोग्‍य, पंचायत समिती, कृषी, सार्वजनिक बांधकाम विद्युत, सामाजिक वनीकरण, कौशल्‍य विकास आदी विभागांनी आपल्‍या विभागाशी संबंधित योजनांची माहिती व अभियान कालावधीतील नियोजनाबाबत बैठकीत माहिती सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *