तुर, हरभरा व गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन । शेतीविषयक

तुर, हरभरा व गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन । शेतीविषयक

तुर, हरभरा व गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन । शेतीविषयक

वर्धा, दि. १० जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : सद्यस्थितीत धुके व ढगाळ वातावरण असुन पिकावरील किडीच्या वाढीस हे वातावरण पोषक आहे. अशा वातावरणामुळे तुर व हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

  • तुर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळी अकात्मिक कीड व्यवस्थान- पूर्ण वाढ झालेल्या अळ्या हाताने वेचुन नष्ट कराव्यात व प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे शेतात उभारावे.
  • अळ्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील, त्या गोळा करुन नष्ट कराव्यात. (महाराष्ट्र शासन उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना)
  • 50 टक्के फुलोरावर असतांना पहिली फवारणी – 5 टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेकटीन 0.03 (300 पीपीएम) 50 मिली किंवा अझडीरेक्टीन 0.15 टक्के (1500 पीपीएम) 25 मिली किंवा एच.ए.एन.पि.व्हि. 500 एल.ई., हे. किंवा क्विलॉलफॉस 25 ई.सी. 20 मिली. प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसानंतर दुसरी फवारणी – इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा लॅमडासायहेलाथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली. किंवा इंडोक्सार्ब 15.8 ईसी 7 मिली. क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 टक्के एससी प्रवाही 3 मिली प्रती 10 पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन – शेतामध्ये प्रति हेक्टरी 20 बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे तयार करुन लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्यांचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे लावावेत.
  • 50 टक्के फुलोरावर असतांना पहिली फवारणी – निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपिव्ही 500 एलई हे किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी, 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात फवारणी करावी.
  • पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी – इमामेकटीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 3 ग्रॅम किंवा इथिऑन 50 टक्के ईसी 25 मिली किंवा फ्लुबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युजी 5 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 टक्के एस.सी. 2.5 मिली प्रति 10 लीटर पाण्यात फवारणी करावी.
  • गहू पिकावरील मावा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी थायमेथाक्झॅम 25 टक्के डब्ल्युजी 10 ते 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. (महाराष्ट्र शासन उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना)
  • गव्हावर ताबेरा हा बुरशीजन्य रोग आढळल्यास प्रोपीकोनिझोल 25 टक्के ईसी 90 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • औषधांच्या मात्रा नॅकसॅक या साध्या पंपासाठी आहेत. परंतु जे शेतकरी बॅटरी ऑपरेटेड पंप वापरतात त्यांनी औषधाची मात्रा दुप्पट करावी आणि जे शेतकरी पॉवर ऑपरेटेड स्पे्रपंप वापरतात त्यांनी औषधाची मात्रा तिप्पट करावी.

असे तुर, हरभरा व गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन करण्या संधर्भात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment