पुणे, दि. १८: वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शासनाने मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गामधील धनगर समाजाचे विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, स.क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलीस स्थानकासमोर, येरवडा, पुणे-०६ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.