Image Credit : Pixabay.com

दूध भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्रीच टाकणार छापे..! || Majo Action Against Those Who Adulterated Milk in Maharashtra

महाराष्ट्र राज्यात दूध दरावरून विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच भेसळयुक्त दूधा विरोधात महाराष्ट्र राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विशषेश म्हणजे या कारवाईत मंत्रीच स्वतः सहभागी होणार आहेत. दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग संयुक्तपणे ही कारवाई करणार आहेत. भेसळ आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई होईल आणि दुधात नीळ टाकून ते पिण्यासाठी पाठविले जाणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. या मोहिमेत मराठवाडा भागात दुग्धविकास मंत्री  तर पश्चिम महाराष्ट्रात राज्यमंत्री दत्तात्रेय भारणे हे स्वतः सहभागी होणार आहेत. याशिवाय ठिकठिकाणी अधिकाऱ्यांची पथके कारवाई करणार आहेत.

दूध दरात सुधारणा व्हावी यासाठीच्या उपायांचा एक भाग म्हणून भेसळयुक्त दुधावर छापे टाकण्याची मोहीम महाराष्ट्र सरकारने आखली आहे. दुधाला वाढीव व चांगला दर मिळावा यासाठी विविध शेतकरी संघटना आणि भारतीय जनता पार्टी तर्फे ही आंदोलन सुरू आहे. त्यापैकीच भेसळयुक्त दूध रोखण्याची एक मागणी आहे. त्यानुसार दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आता अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात राज्यभर भेसळयुक्त दुध यासंबंधी तपासणी करण्यात येणार असून दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भारणे हेही या मध्ये सहभागी होणार आहेत. शेतकरी संघटनेच्या सूकाणू समितीचे अनिल देठे पाटील यांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.

55

‘करोनामुळे दुधाची मागणी घटली आहे. अशात दर कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी या व्यवसायात चांगले दिवस आणायचे असतील तर राज्य सरकारने सर्वांत प्रथम दूध शितकरण, निर्जंतुकीकरण व प्रोसेसिंगच्या नावाखाली दूध भेसळ तसेच टोण्ड दूध आणि डबल टोण्ड दुधावर कायमचीच बंदी घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने असा धाडसी निर्णय घेतल्यास दूध दराबाबतच्या समस्यांचे समूळ उच्चाटन होऊन ग्राहकांना देखील शुध्द व गुणवत्तापूर्ण दूध मिळेल,’ अशी मागणी सूकाणू समितीचे अनिल देठे पाटील यांनी सरकारकडे केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *