Printing of 2,000 rupee notes stopped, clarification from RBI…Printing of 2,000 rupee notes stopped, clarification from RBI…

दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबली, ‘आरबीआय’कडून स्पष्टीकरण… Printing of 2,000 rupee notes stopped, clarification from RBI…

सध्या चलनातून दोन हजार रुपयांची नोट गायबच झाल्याचे दिसते. ‘एटीएम’मधूनही दोन हजाराची नोट मिळत नाही. त्यामुळे ही नोट बंद झाली का, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये नोटाबंदी जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच दोन हजारांची नोट बाजारात आली होती. मात्र, 2019-20 आणि 2020-21 या दोन आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईबाबत सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. याचा अर्थ या नोटांचे मुद्रण 2019-20 पासूनच थांबले आहे. ‘आरबीआय’च्या वार्षिक अहवालानुसार 2020-21 मध्ये दोन हजारांच्या नवीन नोटांचा पुरवठा झालेला नाही.

दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबली, ‘आरबीआय’कडून स्पष्टीकरण… Printing of 2,000 rupee notes stopped, clarification from RBI…

‘एटीएम’मधून 2000 रुपयांच्या नोटांच्या कॅसेट काढल्यामुळे या नोटा बंद होणार असल्याची चर्चा आहे. रिझर्व्ह बँकेने 26 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटांचा नवीन पुरवठा होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता सरकारनेही या नोटा छापणार नसल्याचेही सांगितले आहे. गेल्या दोन वर्षांत 2000 च्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत. काळा पैसा पुन्हा एकदा वाढू नये, या उद्देशानंच सरकारने 2000 रुपयांच्या नवीन नोटा न छापण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *