नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची सभा संपन्न महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचा विकास साधावा – सहा. महाप्रबंधक सुनिल नवसारे

परभणी,दि.22 (आजचा साक्षीदार): महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) परभणी व्दारा अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची स्थापना झाली असून या केंद्राची सहावी वार्षिक साधारण सभेस महिलांच्या उत्सु्फर्त प्रतिसाद होता. यावेळी महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन नाबार्डचे नाबार्डचे महाप्रबंधक नाबार्ड सुनिल नावसारे यांनी केले.होते

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीन बेगम शेख अध्यक्ष नई रोशनी लोक संचलित साधन केंद्र परभणी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंझाडे, जिल्हा उद्योग केंद्र चे व्यवस्थापक पवार, पशुजन्य पदार्थ विशेष तज्ञ प्रा.अनिता चापलवर, मा.डॉ .संजय लोंढे, आयसीआयसीआयचे महेश महके, विशेष तज्ञ डॉ अरुणा खरवडे, कार्यक्रम अधिकारी माविम प्रकाश दवणे, व्यवस्थापक जयश्री टेहरे आदी उपस्थित होते

नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची सभा संपन्न महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचा विकास साधावा – सहा. महाप्रबंधक सुनिल नवसारे

कार्यक्रमामध्ये नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची स्थापना 2016 मध्ये झाली असून आजपर्यंत केंद्रामध्ये अल्पसंख्याक व day nulm कार्यक्रमांतर्गत एकूण 499 महीला बचत गटाच्या माध्यमातून 5 हजार 518 महिलांचे संघटन आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वत:चे लघु उद्योग सुरू केले असून, समान व्यवसाय करणाऱ्या महिलांचे 16 उद्योजक गट पण तयार करण्यात आले आहेत. केन्द्रामार्फत सोशल इंटरप्रायेजेस अंतर्गत विक्री केंद्र व नाबर्डव्दारा सहायीत रुरल मार्ट आहे. बचत गटांना विविध बँकमार्फत 18 कोटी 78 लाख रुपये विविध बँकेमार्फत मिळुन दिला असून त्याची परतफेड देखील 99 टक्के झाली आहे. आज अखेर बचत गटाच्या अंगावर 5 कोटी 28 लाख रु कर्ज आहे. जास्तीत-जास्त महिला बचत गटांना व ME लोन, JLG ग्रूप यांना बँक कर्ज पुरवठा करण्यासाठी नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राने विविध बँकेसोबत समझोता करार केले आहे. भविष्यकालीन अल्पसंख्यक महिलांचे विकास वाटचालीबाबत व संस्थेच्या ध्येय धोरणाबाबत व पुढील वर्षी करावयाच्या कामाचे नियोजन याबाबत सविस्तर मांडणी व्यवस्थापक जयश्री टेहरे यांनी आपल्या प्रास्ताविकातुन केली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रमुख मान्यवराच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून झाली. मान्यवराचे स्वागत गीताबरोबरच वृक्षाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. केंद्राच्या सचिव अनीसा शेख यांनी व लतिफा बी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालाचे व सभेपुढील विषयाचे वाचन केले.केले

नाबार्डचे सहा. महा प्रबंधक सुनिल नवसारे यांनी नई रोशनी लोक संचलित साधन केंद्र मार्फत चालू असलेल्या कामाचे कौतुक केले व नाबार्ड अंतर्गत चालु असणाऱ्या विविध योजनेची महिती दिली. डॉ. अरुणा खरवडे विषय विशेष तज्ञ परभणी यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषी विज्ञान केंद्र परभणी यांचे मार्फत नई रोशनी लोक संचलित साधन केंद्र मधील महिलाना विवध प्रकारचे अन्नप्रक्रिया, शेळी पालन, कुकुट पालन व शेती विषयी प्रशिक्षण दिले आहेत. महिला ह्या लघु उद्योगाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत आहे. नई रोशनी केंद्राचे काम हे नावाजण्याजोगे आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.

माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंझाडे म्हणाले की, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमा अंतर्गत नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राचे कार्य आणि कर्तुत्व अत्यंत कौतुकास्पद व उल्लेखनिय आहे. बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेली महिलांची हर चळवळ अत्यंत सक्षमपणे व शास्वत स्वरूपात उभी आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय व त्याच बरोबर अपला व आपल्या कुंटूबाचा सर्वांगीण विकास साधण्यास हाथभार लावला आहे.

संप्पती व सामाजिक न्याय त्याच बरोबर महिलांचा मानसन्मान प्रतिष्ठा विकासाच्या केंद्र बिंदू विविध प्रकारचे महिलांचे प्रश्न त्याचा अडीअडचणी नाविन्य पूर्ण उपक्रम उभारण्याचे काम व ते यशस्वीरित्या कार्यन्यवित करण्याचे काम या केंद्रा मार्फत मार्फत करण्यात आलेले आहे त्यामुळेच महीला विकासाच्या केंद्र बिंदू बनल्या आहेत. केंद्राची स्वतःची जागा , व विविध डेमो स्ट्रेशन युनीट , महिलांना प्रशिक्षण केंद्र , मालाची गुणवत्ता सुधार न्याच्या दृष्टिने पॅकेजिंग लेबलिंग व ग्रेडिंग तसेच नाविन्य पूर्ण सोशल इंटर प्रेनरस उपक्रम महिला उद्योजक बनण्याच्या दृष्टिने केंद्रा मार्फत येत्या काळात करण्याबाबत अहवाहन देखील केले त्याच बरोबर बचत गटाच्या माध्यमातून अथवा वैकतिक महिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड हि अपली जबाबदारी समजून प्रमाणिकपणे परतफेड करण्याबाबत देखील यावेळी अपेक्षा केली.

या वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये सन 21-22 मध्ये उत्कृष्ट बँक लिंकेज निवडक गटाच्या, दोन मुलीवर ऑपरेशन केले. त्या महिलांचा, परस्थितीशी झुंज देत बचत गटचा आधार घेऊन आपल्या मुलीला बॉटनी या विषयात सर्वोत्तम पदवी पीएचडी प्राप्त केली त्याबद्दल त्या मातेचा व मुलीचा, मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तेजश्री फायनाशियल सर्व्हिस या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल समता वस्तीस्तर संघाचा आणि उत्कृष्ठ उद्योजक यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा खाडे यांनी केले तर आभार मिरा कराळे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येन माहिलांची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment