अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा (Harshchandragad Kokankada)

हरिश्चंद्र गडाचा कोकणकडा हे निसर्गाचे अप्रतिम शिल्प आहे. तेथून माळशेज घाटाचे विहंगमदृश्य दिसते. अनेकदा वरून टाकलेली वस्तूही हवेच्या दाबाने परत वर येते. गडावरील मंदीरापासून सुमारे तीन किलोमीटरवर हा कडा आहे. पावसाळ्यात याठिकाणी सुंदर पुष्पोत्सव बहरतो. तो पाहण्यासाठी पुणे-मुंबईतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे येतात.

अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण ‘कोकणकडा’ हा एकमेव अद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही.

करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागात कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ‘ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.

अंतर : नगरपासून 108 कि.मी, शिर्डीपासून ८५ किलोमीटर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *