नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | महाराष्ट्राचे वैभव-कळसुबाई (KALSUBAI)
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे सह्याद्रीच्या रांगेतील राज्यातील सर्वांत उंच असलेले कळसुबाईचे शिखर (उंची १६४६ मीटर) नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. या शिखरावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी कळसुबाईंचे छोटे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी बारी गावाकडून पायवाट आहे. मंदिरातील मूर्ती गोलाकार, गंडकी शिळेची आहे. घटस्थापनेच्या वेळी नवरात्रामध्ये पाचव्या आणि सातव्या माळेला कळसुबाई शिखरावर ती खूप गर्दी असते म्हणून या माळेला ‘पाहुण्यांची माळ’ म्हणून ओळखले जाते.
कळसूबाई शिखराच्या पायवाटेवर पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत सहा इंच उंच व पंचेचाळीस इंच इतक्या अरुंद अशा सुमारे बाराशे पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत तर ज्या ठिकाणी खूपच अवघड रस्ता आहेत व पायऱ्या करणे शक्य नाही अशा ठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावर नवीन शिडी लावून रेलिंग तयार करण्यात आले आहेत.
शिखराच्या पायथ्याशी बिबट्यांचा संचार असलेले अभयारण्य आहे. जंगलात विविध जातींची शेकडो वर्षांची जुनी झाडे आहेत. या भागात ठाकर व महादेव कोळी जमातीचे आदिवासी राहतात.
अंतर : – अहमदनगरपासून १६८ कि.मी., संगमनेर- भंडारदरा ६० कि.मी., भंडारदरा-कळसुबाई ८ कि.मी.
नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | महाराष्ट्राचे वैभव-कळसुबाई (KALSUBAI)
नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | महाराष्ट्राचे वैभव-कळसुबाई (KALSUBAI)