अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.
0 0
Read Time:3 Minute, 46 Second

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | प्रवरेकाठची देवभूमी – देवगड (DATTAMANDIR DEVGAD)

अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्री क्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

संपूर्ण देवगड मंदिराची वास्तु ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्तमंदीर आहे. संपूर्ण भव्य मंदीर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडातून पूर्ण बांधकाम केलेले आहे. मंदिराचे फरशी कामही संगमरवरी असून मंदिरास ४ फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. अत्यंत सर्वांगसुंदर प्रसन्न दत्तमूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे. येथील मूर्ती समोरून हटावेसेच वाटत नाही. ही अत्यंत जिवंत आणि जागृत दत्तमूर्ती आहे. संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे.

या मंदिर परिसरात सातत्याने चालू असणारे मंत्र उच्चारण मंदिराच्या पवित्र वातावरणात भरच टाकते. या मंदिर परिसरात दत्तमंदिर, शनीमहाराज, मारुती, मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, नारदमुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्र्वर, पार्वती, गणेश व कार्तिकस्वामी अशी स्थाने आहेत. श्री दत्तमंदिराच्या बाजूसच श्रीकिसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे. येथील महाद्वारच मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते. येथील गोपुरे अत्यंत सुंदर आहेत. पावसाळ्यात तेथे नौकानयनही करता येते. भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास बांधण्यात आले आहे. कमालीची स्वच्छता व शांतता हे येथील वैशिष्ट्ये आहे.

कसे जाल –

अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगर पासून ६६ कि. मी. वर आहे. औरंगाबादपासून ५३ कि. मी. वर आहे.

श्रीक्षेत्र देवगडला येण्यासाठी मार्ग –

विमानसेवा: औरंगाबाद ५३ कि. मी. अथवा पुणे १८० कि. मी. येथपर्यंत विमानसेवा उपलब्ध.

रेल्वेसेवा: औरंगाबाद, अ. नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या ठिकाणांपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

बससेवा: औरंगाबाद ते पुणे महामार्गावर देवगड फाटा येथून केवळ ५ कि. मी. अंतरावर श्रीक्षेत्र देवगड आहे.

अंतर –

पुणे – श्रीक्षेत्र देवगड १८० कि. मी.

अ. नगर – श्री क्षेत्र देवगड ६६ कि. मी.

शिर्डी – श्री क्षेत्र देवगड ७० कि. मी.

औरंगाबाद – श्री क्षेत्र देवगड ५३ कि. मी.

नेवाशापासून – श्री क्षेत्र देवगड १४ कि. मी.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *