नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | कृषी शिक्षणाची पंढरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.
शेतकऱ्यांसाठी विद्यापीठात माहिती- कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील अद्ययावत अशा दालनात विविध संशोधनाची सचित्र अशी माहिती दिली जाते. विद्यापीठातील विविध प्रकल्प व माहिती कक्ष- सुमारे ८००० एकर प्रक्षेत्रावर वसलेल्या या कृषी विद्यापीठात अनेक विविध पिकांवर व पिकांसाठी संशोधन सुरू आहे. संशोधन आणि पिकांच्या प्रकारानुसार विविध प्रकल्पांची या ठिकाणी उभारणी केली आहे. आज गो संशोधन प्रकल्पात फुले त्रिवेणीचे गोठीत वीर्य शेतकऱ्यांना कृत्रीत रेतनासाठी पुरेशा प्रमाणात व वाजवी दरात उपलब्ध आहे.
अशा रीतीने विद्यापीठात सर्वत्र माहिती घेतल्यानंतर विद्यापीठात दूरवरच्या शेतकऱ्यांना वाजवी दरात राहण्याची सुद्धा सोय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जे शेतकरी विद्यापीठापर्यंत पोहचू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत फोनवर सुद्धा सल्ला दिला जातो. त्यासाठी संपर्क कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र (०२४२६) २४३८६१, २४३८६२, २४३०७३