नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | श्रध्दा आणि सबुरी | शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर

शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा शिर्डीत आहेत. गुरुस्थान द्वारकामाई, लेंडीबाग, चावडी, साईबाबांनी पेटवलेली धुनी ते बसत असलेला दगड, खंडोबा मंदिर तसेच त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू शिर्डीत पहावयास मिळतात.

साईबाबा समाधी मंदिरचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात. रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि दसरा हे उत्सव हे येथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. साई संस्थानच्या वतीने साईबाबा समाधी मंदिर परिसरात साईबाबांचे वस्तुसंग्रहालय, सांस्कृतिक सभागृह व वाचनालय सुरू करण्यात आले आहे. दीक्षित वाड्यात असलेल्या संग्रहालयात साईबाबांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांची दुर्मिळ छायाचित्रे पहावयास मिळतात.

अलीकडेच साईबाबा समाधी मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला असून, भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. साईबाबा समाधी मंदिर संस्थानच्या भक्त निवासात अल्प दरात राहण्याची सोय होऊ शकते. तेथे जाण्यासाठी एस.टी. तसेच खासगी बसगाड्यांची चांगली सोय आहे. राहण्यासाठी शिर्डीत महाराष्ट्र पर्यटन विकास केंद्राचे विश्रामगृह, खासगी लॉज व पंचतारांकित हॉटेलही आहेत.

अंतर : – समृध्दी महामार्गापासून १० किलोमीटर / अहमदनगरपासून ८१ किलोमीटर/नाशिकपासून ९० किलोमीटर

अंतर : – समृध्दी महामार्गापासून १० किलोमीटर / अहमदनगरपासून ८१ किलोमीटर/नाशिकपासून ९० किलोमीटर

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment