नगर जिल्ह्यातील समृध्द वारसा | अमृतातेही पैजा जिंके | श्री ज्ञानेश्वर मंदिर – पैस खांब, नेवासे
अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.
या पवित्र स्तभांवर चंद्र-सूर्य व शिलालेख कोरलेला असून त्यात अखंड दीपासाठी केलेल्या दानाचा उल्लेख आहे. फाल्गुन वद्य एकादशी ते यात्रयोदशीपर्यंत या खांबाची यात्रा भरते. त्यावेळी त्याला मुकूट घालतात. ज्ञानेश्वर मंदिरासमोर बन्सी महाराज तांबे यांची समाधी आहे. ज्ञानेश्वर मंदिराच्या उत्तरेला सुमारे १०० मी. अंतरावर लाडमोड टेकडी आहे. तेथे उत्सखनन झाले असून इ. स. पूर्व १५०० ते ७०० या काळातील ताम्रपाषाण संस्कृतीचे अनेक अवशेष तेथे सापडले आहेत. त्यातील काही अवशेष नगरच्या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.
अंतर : अहमदनगर ते नेवासे ५६ कि.मी.