नगर तालुक्यातील 19 केशरी रेशनकार्डधारक दिव्यांग कुटूंब व्यक्तींचा अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समावेश… || Benefits

 

नगर तालुक्यातील 19 केशरी रेशनकार्डधारक दिव्यांग कुटूंब व्यक्तींचा अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समावेश...

नगर तालुक्यातील 19 केशरी रेशनकार्डधारक दिव्यांग कुटूंब व्यक्तींचा अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समावेश…            

नगर तालुक्यातील 19 केशरी रेशनकार्डधारक दिव्यांग कुटूंब व्यक्तींना अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समाविष्ट करण्यात आले असून सदरचे रेशनकार्डधारकांना अंत्योदय शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. तहसीलदार उमेश पाटील यांच्याहस्ते या कुटुंबियांना या शिधापत्रिका वितरण करण्यात आले. यावेळी त्यावेळी  नायब तहसिलदार प्रविणा तडवी,  तहसील विभागातील पुरवठा विभागाचे विश्वास आढाव, महादेव कुंभार, प्रहार दिव्यांग क्रांती आदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, हमीद शेख, संजय पुंड, संदेश रपारीया आदी उपस्थित होते.

हे 19 केशरी रेशनकार्डधारक (दिव्यांग कुटूंब) हे पूर्वी प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचा लाभ घेत असतांना त्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू  प्रति किलो दोन रुपये दराने आणि तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो रुपये 3 प्रति किलो या प्रमाणे धान्य मिळत होते. परंतू आता 19 केशरी रेशनकार्डधारक (दिव्यांग कुटूंब) यांना अंत्योदय योजने (Antyodaya Yojana) मध्ये समाविष्ट केल्याने त्यांना दरमहा प्रति रेशनकार्ड 25 किलो गहू प्रति किलो 2 रुपये दराने तर  तांदूळ दर 3 रुपये प्रति किलो याप्रमाणे धान्य मिळणार आहे. याशिवाय, मौजे देहरे, निंबळक, वडगावगुप्ता व विळद येथील आदिवासी भिल्ल समाजातील 35 कुटूंबांना नव्याने केशरी शिधापत्रिकेचे वाटपही करण्यात आले.  

माहिती स्रोत : जिल्हा माहिती कार्यालय फेसबुक पेज 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment