नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पूर परिस्थतीत काय काळजी व खबरदारी घ्यावी… आजचा साक्षीदार | Sakshidar

नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पूर परिस्थतीत काय काळजी व खबरदारी घ्यावी… आजचा साक्षीदार | Sakshidar

आजचा साक्षीदार | Sakshidar : जोरदार पाऊस, धरणांची पाणी पातळी आणि नदीची तसेच लहान , मोठ्या ओढ्यातून वाहत असलेले पाणी यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या पावसामुळे नदी तसेच जवळील नाले, ओढे काठच्या गावांना पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावा साठी खालीलप्रमाणे उपाय योजना व खबरदारी घ्यावी…

काय करावे :
1) गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.
2) गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगर पालिका प्रशासनास कळवावे.
3) गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.
4) पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.
5) पूर स्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी, इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये.
6) कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या.
7) पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरुन जाऊ नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

काय करु नये :
1) पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.
2) पुराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.
3) दूषित, उघड्यावरील अन्न पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.)
4) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करु नका.
5) पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचीत व खोल पाण्यात जाऊ नका.
6) पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करू नका.

मित्रांनो, सदरील पोस्ट हि माहितीपूर्ण आहे. ती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जावी, जास्त लोकांनी वाचावी हा हेतू आहे… 👍

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, कॉपी पेस्ट जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सअप ग्रुप वर जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून संबंधित व्यक्तींना त्याचा नक्की फायदा होईल. 🙏

साक्षीदार #आजचा साक्षीदार #sakshidar

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment