0 0
Read Time:2 Minute, 21 Second

नागरी सेवा परीक्षांच्या (UPSC) मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना विमानभाडे 

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशातील रेल्वेसेवा पूर्णपणे सुरू नसल्याने त्यामुळे नागरी सेवा परीक्षांच्या मुलाखतीसाठी दिल्लीला जाणाऱ्या उमेदवारांना येण्याचे व जाण्याचे विमान भाडे देण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतला आहे. तासेच या उमेदवारांच्या राहण्याच्या, वाहतूक व्यवस्थेसाठीही केंद्रीय लोकसेवा आयोग मदत करणार आहे.
व्यक्तिमत्त्व चाचणीला हजर राहण्यासाठी कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमधून बाहेर पडण्याची व तेथे जाण्याची परवानगी ई – समन पत्रे असणाऱ्या उमेदवारांना द्यावी अशी विनंती सर्व राज्य सरकारांना करण्यात आली आहे’, असे आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नागरी सेवा परीक्षांच्या (UPSC) मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना विमानभाडे 

करोनाचा फैलाव टाळण्यासाठी टाळेबंदी (लॉक डाऊन) लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मार्च २०२० अखेरीस घेतला, त्यावेळी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०१९ साठी २३०४ उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी/ मुलाखती घेण्याच्या विचारात होती पण त्यानंतर उर्वरित ६२३ उमेदवारांच्या मुलाखती लांबणीवर टाकण्याचे आयोगाने ठरवले, असेही आयोगाने या निवेदनात नमूद केले आहे. २० ते ३० जुलै २०१९ या कालावधीत उर्वरित उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी घेण्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने ठरवले असून, याबाबत सर्व उमेदवारांना पुरेशी आधी सूचना देण्यात आली आहे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *