निवासी शाळा व वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन
पुणे, (आजचा साक्षीदार) दि. १० जाने २३ : दौंड येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा व वसतिगृह सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवासी शाळा व वसतीगृहासाठी प्रत्येकी १० हजार चौरस फुट अशी एकूण २० हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या एकत्र अथवा वेगवेगळ्या खाजगी इमारतीची आवश्यकता आहे. या प्रत्येक इमारतींमध्ये प्रवेश क्षमतेनुसार २५ ते ३० खोल्या, १० शौचालये, १० स्नानगृहे, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सर्व पायाभूत सुविधा, तसेच इमारतीच्या भोवती संरक्षक भिंत असावी. (महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन उपक्रम)
दौंड परिसरातील इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर समोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी ०२०-२९७०६६११) किंवा मुख्याध्यापिका, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा दौंड (८०१०६१५३३६) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.