नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

यवतमाळ, दि. 19 ऑगस्ट 2022 : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा दिलासा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिला.

यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे अभिमान लक्ष्मण बोभाटे यांच्या शेतात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार अशोक उईके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार रविंद्र कानडजे, गटविकास अधिकारी बी. के. पवार, रंजन कोल्हे तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

कृषी मंत्री यांनी स्थानिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व खरडून गेलेल्या शेतात आता लवकर पीक घेता येणार नसल्याने होणाऱ्या नुकसानीची जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून मदत करण्यात येईल याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. शेतात घुसणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी स्थानिक स्तरावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार अशोक उईके यांनी राळेगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती कृषी मंत्री यांना दिली. तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला असल्याचे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment