पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

अकोला,दि.6 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार दि.8 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात 86 पदांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात रोजगार इच्छुक युवक युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

या रोजगार मेळाव्‍यात 1) रॅलीज इंडिया लिमीटेड, एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण 10 पदे 2) लिबेन लाईफ सायंन्स प्रा.लि. एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण 15 पदे 3) गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट, अकोला यांनी एकूण 30 पदे 4) एम.एम.इंण्डस्ट्रिज प्रा.एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण 8 पदे 5) नमस्ते वेन्चर प्रा.लि.अकोला येथे एकूण 23 पदे असे एकूण 86 पदांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दहावी, बारावी, पदवी, आय.टी.आय. पदवीधर, पदविका या शैक्षणिक पात्रतेच्या युवक युवतीनी दि. 8 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वखर्चाने व शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट साईझ फोटो सह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment