पदवीधर मतदारसंघ निवडणूक वोटर लिंकवरुन मतदान केंद्राची माहिती उपलब्ध
वाशिम, दि. २७(आजचा साक्षीदार) : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार 30 जानेवारी रोजी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयात एकूण 26 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
पदवीधर निवडणूकीमध्ये मतदान करण्याकरीता मतदार यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे, याबाबतची माहिती https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी मतदारांनी आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी वरील लिंकचा वापर करावा. असे आवाहन उपजिल्हा निवडणूक आधिकारी, वाशिम यांनी केले आहे.