पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी 25 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत..
परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहन नोंदणीसाठी सध्या CE ही मालिका सुरु आहे. सदर मालिका एका दिवसात संपुष्टात येत असल्याने परिवहन संर्वगातील वाहन नोंदणीसाठी CF ही मालिका सुरु करण्यात येणार आहे. सदर नवीन मालिकेतील आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी दि. 25 नोव्हेंबर 2021 रोजी 12.00 वाजेपर्यंत सर्व संबंधितानी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई मु.पो. चंदनसार – भाटपाडा, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर पिन. 401303 येथे अर्ज सादर करावेत.
आकर्षक व पसंती क्रमांकाचे विहीत शुल्क आकारुन नोंदणी चिन्ह आरक्षित करण्यात येईल. जर एखाद्या नोंदणी चिन्हासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केले तर दुसऱ्या दिवशी संबंधित अर्जदारांनी आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शासकीय शुल्कापोटी पाकीट बंद स्वरुपातील ‘धनाकर्ष’ या कार्यालयास जमा करावेत. दुसऱ्या दिवशी चार वाजता त्यांचे समोर सादर केलेले लिफाफे उघडले जातील. ज्यांचा सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष असेल त्यांना नोंदणी चिन्ह देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.