पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

अकोला,दि.22 ऑगस्ट 2022 – प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याचा अधिनियम 1960 अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम 2018 आणि श्वान प्रजनन व विपणन नियम 2017 अधिसुचित केलेले आहेत. पाळीव प्राणी दुकान नियम 2018 मधील नियम क्रमांक चार (50) नुसार पाळीव प्राण्यांच्या दुकानांना राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच नियम क्रमांक 3 नुसार नोंदणी शिवाय डॉग ब्रिडींग सेंटर चालविण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु ठेवता येऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित दुकानचालकांने परिपूर्ण अर्ज महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे करावा,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक…

पाळीव प्राण्यांची जी दुकाने तसेच श्वान प्रजनन केंद्र इ. नोंदणी न करता सुरु राहतील अशा केंद्रांवर कारवाई करण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे. तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, अकोला येथे संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment