पुणे दि. १८ ऑगस्ट २०२२ : पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज शुभारंभ करण्यात आला.

विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांसाठी म्हाडा ही सोडत काढत आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनतौल २७८ सदनिका, प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.