पोस्ट कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध…

महाराष्ट्र, दि. १० ऑगस्ट २०२२ : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येणार आहे. भारतीय राष्ट्रीय ध्वज हे राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिक आहे. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम सर्व देशभर मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे.

यात घरोघरी तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकाविता यावा यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या राष्ट्रध्वजाची किंमत 25 रुपये असणार आहे.


नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे हा एकमेव उद्देश या मोहिमेमागचा आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परभणी डाक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment