महाराष्ट्र-शासन-उपक्रम-महाराष्ट्र-शासन-योजना-सरकारी-योजना (2)महाराष्ट्र-शासन-उपक्रम-महाराष्ट्र-शासन-योजना-सरकारी-योजना (2)

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात तंबाखू व ई- सिगारेट मुक्तीची शपथ

हिंगोली,दि. २७(आजचा साक्षीदार) : राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण राज्य तंबाखु व ई- सिगारेट मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता प्रत्येक शाळामध्ये तसेच शासकीय कार्यालयामध्ये तंबाखू व ई- सिगारेटच्या मुक्तीसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.

येथील जिल्हा माहिती कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त तंबाखू व ई- सिगारेटच्या मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी उपसंपादक चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक श्रीमती आशा बंडगर, लिपिक टंकलेखक कैलास लांडगे, शिपाई चंद्रकांत गोधने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *