प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ एसटी चालकांचा सत्कार
पुणे, दि. २७(आजचा साक्षीदार) : एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ विना अपघात सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ वाहन चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील इंदापूर आगारातील ५, तळेगाव १, नारायणगाव ३, भोर ५, पिंपरी २, शिरूर ४, शिवाजीनगर ३, दौड २, बारामती ४, सासवड ७, स्वारगेट ३, भोसरी प्रशिक्षण केंद्र १, विभागीय कार्यालय २ असे एकूण ४२ वाहन चालकांचा सत्कार करण्यात येणार आहेत.
सत्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश आहे, अशी माहिती असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.