प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जनजागृती पंधरवाडा….

वाशिम, दि. 24 (आजचा साक्षीदार) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेला व्यापक स्वरूप देण्यासाठी १५ ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत कृषि प्रक्रीया जागृती पंधरवडा साजरा केला जात आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये उलेखनीय कामगीरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले आहे. सर्व ग्रामसभेत कृषी सहाय्यकामार्फत योजनेचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.

इच्छुक पात्र लाभार्थ्यांची आवश्यक दस्तावेजाच्या प्रती घेऊन माहिती जिल्हा संसाधन व्यक्तीकडे सुपुर्द करतील. १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान बँकांकडे जे प्रकल्प आराखडे मंजुरीसाठी सादर केले आहेत, त्यांचे बँकांच्या शाखा व्यवस्थापकांची एकदिवशीय कर्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची बँक अधिकाऱ्या समक्ष पडताळणी करून त्रुटींची पूर्तता करून घेण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जनजागृती पंधरवाडा….

जिल्हा संसाधन व्यक्ती सर्व लाभार्थ्यांचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करून जिल्हा नोडल अधिकाऱ्यांमार्फत विहीत कार्यपध्दतीनुसार ऑनलाईन प्रस्ताव बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी सादर करतील. याबाबत संबंधित तालुक कृषी अधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी सनियंत्रण करतील. जिल्हास्तरावरील प्रस्ताव प्रलंबित असणाऱ्या बँका, संबंधित कृषी अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती, बँक शाखा व्यवस्थापक व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांची एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment