बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार…..!
महाराष्ट्रातील बारावी बोर्डाची परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी झाला असून मूल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय शुक्रवारी (11 जून) जारी करण्यात आला. त्यानंतर सुधारित मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार…..!
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
● यावेळी ते म्हणाले होते की, “मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही.
● सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.