बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत…

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

नांदेड दि. 22 ऑगस्ट 2022 :– जिल्हयातील बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 3 लाख रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडील शासन निर्णय 11 डिसेंबर 2015 नुसार जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाकडे नोंदणी प्रमाणपत्र अद्यावत केले आहे आणि ज्या संस्थेचे ऑडीट रिपोर्ट अद्ययावत आहे अशा संस्थांनी पुढील कामाबाबत आपले प्रस्ताव मंगळवार 30 ऑगस्ट 2022 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड या कार्यालयात सादर करावी.

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप  प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत…

त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प विभाग देगलूर अंतर्गत लेंडी प्रकल्प उपविभाग क्र. 1 ईटग्याळ या कार्यालयाकडील एमएच 26 आर 121 या निरिक्षण वाहनासाठी नोंदणीकृत वाहन चालक कामगार सहकारी संस्थांची अकरा महिन्यांसाठी एलएमव्ही वाहन चालकाची सेवा पुरविण्याकरिता शिफारस करण्याबाबत (एलएमव्ही वाहन चालकाची संख्या 1) अंदाजपत्रकिय किंमत 1 लाख 73 हजार 413 रुपये व लेंडी प्रकल्प विभाग देगलूर अंतर्गत लेंडी प्रकल्प उपविभाग लघु पाटबंधारे या कार्यालयाकडील एमएच 11 जी 5876 या निरीक्षण वाहनासाठी नोंदणीकृत वाहन चालक कामगार सहकारी संस्थांची 11 महिन्यासाठी एलएमव्ही वाहन चालकाची सेवा पुरविण्यासाठी शिफारस करण्याबाबत. एलएमव्ही वाहन चालकाची संख्या 1 अंदाजपत्रकिय किंमत 1 लाख 43 हजार 413 रुपये याप्रमाणे कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे.

प्रस्तावासोबत संस्थेचे अद्यावत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे ऑडिट रिपोर्ट सन 2021-22, बॅंकेचे स्टेटमेंट ही कागदपत्रे जोडावी लागतील. आवश्यक अटी व शर्तीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment